ठाणे रेल्वेस्थानक परिसरात शिवशाही बसला आग


ठाणे, २३ एप्रिल (वार्ता.) –
राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला २३ एप्रिल या दिवशी दुपारी ठाणे रेल्वेस्थानकाजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. स्वारगेट ते वसई मार्गावरील बस दुपारी १.३० वाजता रेल्वेस्थानक परिसरात पोचताच इंजिनाच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. चालक संतोष गवळी आणि वाहक मिलिंद सोनवणे यांनी प्रसंगावधान राखत बसमधील १२ प्रवाशांना तात्काळ सुरक्षितपणे खाली उतरवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली.