वर्ष २००६ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

नाशिक – मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष २००६ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील ४ हिंदु आरोपींवरील दोषारोप रहित केले आहेत. राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायालयाने त्यांच्यावर हत्या, गुन्हेगारी कट रचणे या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रहित केला.
‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करण्यात आला नव्हता. त्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरली’, अशी भूमिका आरोपींच्या अधिवक्त्यांनी केली. ‘यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही’, असा युक्तीवादही करण्यात आला. उच्च न्यायालयाने या सर्व सूत्रांचा विचार करत आरोपींना दिलासा दिला.
या निर्णयानंतर आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले असून ‘आम्हाला विलंबाने का होईना; पण न्याय मिळाला’, असे सांगितले.
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !