
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, त्यांच्या कार्यक्षमतेत आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जात आहे, ज्यामुळे शेती अधिक सोपी आणि परिणामकारक बनत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना मिळून १७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. परिणामी, शेतीची उत्पादकता वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
– जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !