
सातारा, २१ एप्रिल (वार्ता.) – श्रीक्षेत्र महाबळेश्वरमधील ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कृष्णाबाई (पंचगंगा) मंदिराच्या छताचा एक भाग कोसळला. या घटनेमुळे ऐतिहासिक वारसास्थळांच्या दूरवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गोमुखाखालील कुंडाची स्वच्छता करत असलेले स्थानिक युवक थोडक्यात बचावले आहेत. या ठिकाणीच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या ५ नद्यांचा उगम होतो. या ५ नद्यांचे श्री कृष्णाबाई (पंचगंगा) मंदिर येथेच आहे.
श्री देव महाबळेश्वराच्या मुख्य मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पंचगंगा मंदिर आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून त्यावरील कोरीव काम, भव्य गाभारा, नक्षीकाम केलेले खांब आणि छतावरील शिल्पकला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या समोर गोमुख आणि कुंड असून त्यातून सतत जल वहात असते. पर्यटनामुळे येथे भाविकांची संख्या वाढत असली, तरी मंदिराची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाल्याचे दिसून येते. ‘पंचगंगा मंदिराच्या कोसळलेल्या भागाचा पंचनामा करून मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे’, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि पर्यटक व्यक्त करत आहेत.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !