
पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाने गोव्यातील वारकर्यांसाठी विशेष साहाय्य योजना आणली आहे. या योजनेच्या अंर्तगत गोव्यातील वारकरी (दिंडी) पथकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. गोव्यातील वारकरी संप्रदायाला प्रतिवर्ष पंढरपूर येथील वारीत सहभागी होता यावे आणि वारकर्यांची वारी ही भक्तीपरंपरा अबाधित रहावी, यासाठी ही योजना चालू करण्यात येत आहे. पंढरपूरच्या वारीच्या वेळी गोव्यातील वारकरी संप्रदायाची व्यवस्था व्हावी, या हेतूनेही ही योजना चालू करण्यात आली आहे.
यासाठी गोव्यातील सर्व दिंडी पथकांच्या प्रमुखांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून महत्त्वाच्या कागदपत्रांसह समयमर्यादेत कला आणि संस्कृती संचालनालयाकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले अाहे. योजनेच्या माहितीसाठीचा अर्ज www.artandculture.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्यासाठी १० मे हा अंतिम दिनांक आहे.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष