भूमी अपव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना उच्च न्यायालयाने केला जामीन संमत

शीतल तेजवानी

पुणे – मुंढवा येथील भूमी अपव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा आणि बावधन पोलिसांची कायदेशीर चूक यांमुळे हा जामीन मिळाला. ‘अटकेची प्रक्रिया करतांना पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केले’, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीला अटक करण्याचे कोणतेही ठोस कारण पोलिसांनी दिले नाही. पिंपरी येथील ‘सेवा विकास बँक’ अपव्यवहार प्रकरणी आरोपीला कह्यात घेण्यापूर्वी किमान २ घंटे आधी कळवणे बंधनकारक होते; परंतु पोलिसांनी नियमांची पूर्तता केली नाही. त्यामुळे तांत्रिक सूत्रांवर न्यायालयाने पोलिसांचे अन्वेषण आणि कार्यपद्धती यांवर टीका करून तेजवानी यांना जामीन संमत केला आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी कार्यपद्धतीचे पालन का केले नाही ? याची कारणे शोधायला हवीत !