
सोलापूर – जागतिक तापमान वाढ, सातत्याने होणारी वृक्षतोड, सिमेंटचे रस्ते, काचेच्या वाढत्या इमारती याचा फटका सोलापूरला बसत असून शहरातील तापमान आता ४३.३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. सकाळी ८ पासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारी सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. त्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत अनेक रस्त्यांवर अत्यंत अल्प वर्दळ असते. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ घोषित केला असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतीचे कामगार यांनी विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी लिंबूपाणी, नागरळपाणी, ताक, कोकम सरबत असे पिण्यावर भर द्यावा, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण