१६ एप्रिलला रात्री उशिरा अधिसूचना प्रसारित

नवी देहली – महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणारे ‘महिला आरक्षण अधिनियम-२०२३’ लागू केले. या संदर्भात केंद्र सरकारने १६ एप्रिलला रात्री उशिरा अधिसूचना प्रसारित केली.
केंद्र सरकारने महिला आरक्षण आणि परिसीमन यांच्याशी संबंधित ३ विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी १६ ते १८ एप्रिल या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. यात पहिल्याच दिवशी, म्हणजे १६ एप्रिलला या विधेयकांवर जोरदार चर्चा झाली. लोकसभेच्या अध्यक्षांनी या विधेयकांवर चर्चेसाठी १५ घंट्यांचा वेळ निश्चित केला होता. पहिल्याच दिवशी दुपारी चालू झालेली ही चर्चा रात्री १ वाजेपर्यंत (एकूण १३ घंटे) चालली.
काँग्रेसकडून प्रियांका गांधी, गौरव गोगोई, वेणुगोपाल यांनी विधेयकाच्या विरोधात मते मांडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ३५ मिनिटांचे भाषण झाले. ते म्हणाले की, ‘परिसीमनामध्ये कोणत्याही राज्याशी भेदभाव केला जाणार नाही’, ही माझी हमी (गॅरंटी) आणि वचन आहे. विरोधक याचे श्रेय घेऊ शकतात.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !