
नवी देहली – महिलांचे लोकसभा आणि विधानसभा येथील आरक्षण, तसेच मतदारसंघांची फेररचना यांच्या संदर्भातील ‘नारीशक्ती वंदन’ हे घटनादुरुस्ती विधेयक संमत करून घेण्यासाठी संसदेचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. १६ एप्रिलला पहिल्या दिवशी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यावर त्यावर चर्चा प्रारंभ झाली आहे. १७ एप्रिलला यावर मतदान घेण्यात येणार आहे. या सुधारणा विधेयकात लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसभेत चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या आहेत, तेव्हा ज्या कुणी महिलांच्या या हक्काला विरोध केला आहे, त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांना कधीही क्षमा मिळाली नाही. ज्यांना यात राजकारणाचा वास येतो, त्यांनी स्वतःच्या परिणामांचा विचार करावा. हाच एकमेव लाभ आहे; यामुळे होणारी हानी ते टाळू शकतील. त्यामुळे, याचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच, या देशातील महिला आमच्या सदोष हेतूंना कधीही क्षमा करणार नाहीत.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक