अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणार ऐतिहासिक सोहळा

आळंदी (पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त, तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ४५० व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त जर्मनीतील ख्रिसचेम येथील ‘श्री विठ्ठलधाम’ मंदिरात दोन्ही संतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १९ एप्रिल या दिवशी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
देहू आणि आळंदी येथून संस्थानचे विश्वस्त अन् वारकरी १६ एप्रिलला जर्मनीला रवाना होतील. या निमित्ताने श्री विठ्ठलधाम, ख्रिसचेम जर्मनी येथील श्री भगवान विठ्ठलाच्या मंदिरात भजन, कीर्तन प्रवचन आणि ‘नमो ज्ञानेश्वरा’ कार्यक्रम होणार आहेत. १९ एप्रिलला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’च्या आळंदीचे प्रमुख विश्वस्तांचे कीर्तन, भारूडकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे इंग्रजीमधून कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १२.३० वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान