
मुंबई – वर्ष १९९३ मधील मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील गुन्हेगार अबू सालेम याच्या सुटकेच्या मागणीची याचिका १५ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
केंद्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता जनरल अनिल सिंह यांनी ‘सालेम याने प्रविष्ट केलेली याचिका अयोग्य असून ती मान्य करता येणार नाही’, अशी भूमिका न्यायालयात मांडली. यापूर्वी वर्ष २०२५ मध्ये अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सुनावणीसाठी आली होती. त्या वेळी ‘ही याचिका योग्य वाटत नसली, तरी सुनावणीसाठी प्रविष्ट करून घेत आहोत’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. मुंबई साखळी बाँबस्फोटानंतर अबू सालेम परदेशात पळून गेला होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वर्ष २००५ मध्ये अबू सालेम याचे पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगार करारा’नुसार भारत सरकार त्याला २५ वर्षांहून अधिक कारागृहाची शिक्षा देऊ शकत नाही. स्वत:च्या चांगल्या वर्तणुकीचे कारण देऊन शिक्षेतील रहित करण्याचा कालावधी धरला, तर २८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी शिक्षेचा कालावधी संपत असल्याचे अबू सालेम याने याचिकेत नमूद केले होते. प्रत्यक्षात अबू सालेम याची २५ वर्षांची शिक्षा १० नोव्हेंबर २०३० या दिवशी पूर्ण होणार आहे. सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेतसून त्याच्यावर आंतकवाद, हत्या, खंडणी यांसारखे अत्यंत गंभीर गुन्हे नोंद आहेत. सध्या तो तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !