
नवी मुंबई – विनाअनुमती वृक्ष छाटणी केल्याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान साहाय्यकाद्वारे कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
कोपरखैरणेमध्ये काही वृक्षांची छाटणी करण्यात आली होती. कोपरखैरणे विभागाचे उद्यान साहाय्यक श्रीकांत जाधव यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. प्रत्यक्ष पहाणी केल्यावर वृक्ष छाटणी विनाअनुमती झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी वृक्ष छाटणी करणारे एस्.एम्. पाटील यांना नोटीस बजावली. त्यामुळे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, याविषयी ७ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा, असे नोटिसीमध्ये नमूद केले होते. त्यानंतर पाटील यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक न वाटल्याने महापालिकेच्या वतीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
| ‘शहरामध्ये कुणीही विनाअनुमती वृक्ष छाटणी करू नये, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.’ – उद्यान विभागाचे आवाहन |
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !