कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी पोलीस चौकशी करणार !

शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्या आहेत. ‘समता पतसंस्थे’तील २ कोटी ४० लाख रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराच्या प्रकरणी पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. ४ दिवसांपूर्वी शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस पाठवली होती.
१. भोंदू अशोक खरात याने गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांमध्ये केवळ प्रतिभा चाकणकरच नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या खात्यांचाही समावेश असल्याचे अन्वेषणात समोर आले.
२. ४ खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. खरात हा समता पतसंस्थेतील १०० आणि जगदंब पतसंस्थेतील ३२ खात्यांवर ‘नॉमिनी’ (वारसदार) होता.
३. ५७ अज्ञात व्यक्तींच्या नावावर खाती उघडून ६० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे. धक्कादायक म्हणजे अनेक खातेदारांना त्यांच्या नावे खाते असल्याचे ठाऊकच नाही.
या भ्रष्टाचार प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांना ‘राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षपदासह पक्षाच्या पदाचेही त्यागपत्र द्यावे लागले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक