उद्यापासून नोंदणी करता येणार
श्रीनगर (जम्म-काश्मीर) – यंदाच्या वर्षातील अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून आरंभ होणार आहे. यात्रेसाठीची नोंदणी १५ एप्रिलपासून चालू होईल. यंदा ही यात्रा २८ ऑगस्टपर्यंत असेल, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. जम्मू येथील भगवतीनगर बेस कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला गट मार्गस्थ होईल. एकूण ५७ दिवस चालणार्या या यात्रेसाठी अनंतनाग येथून पारंपरिक ४८ किमी लांबीचा नुनवान-पहलगाम मार्ग, तसेच गांदरबल येथून १४ किमी लांबीचा बालटाल मार्ग उपलब्ध आहे.
अशा प्रकारे करता येणार नोंदणी !
१. १३ ते ७० वर्षे वयोगटातील लोक ही यात्रा करू शकतात.
२. देशभरातील ५५६ निश्चित बँक शाखांमधून यात्रेसाठी नोंदणी करता येईल.
३. यासमवेतच ‘श्री अमरनाथजी श्राईन बोर्डा’च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारेही ऑनलाईन नोंदणी करता येईल.
४. नोंदणीसाठी ‘येस बँक’, ‘आयसीआयसीआय बँक’, ‘पंजाब नॅशनल बँक’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘ॲक्सिस बँक’ यांच्या शाखांमध्ये यात्रेचे नोंदणी अर्ज उपलब्ध असतील.

कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक