
नोएडा (उत्तरप्रदेश) – देहलीच्या सीमेवर असणार्या नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या येथील कारखान्यांतील कर्मचार्यांचे आंदोलन १३ एप्रिलला हिंसक झाले. कर्मचार्यांनी दगडफेक केली, तसेच अनेक वाहने आणि बसगाड्या यांना आग लावली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर आंदोलक कर्मचार्यांनी पोलिसांची गाडी उलटवली. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना नोएडा फेज-२ मध्ये घडली. हा परिसर औद्योगिक क्षेत्र आहे. येथे मदरसन, ऋचा ग्लोबल, रेनबो, पॅरामाउंट, एसएनडी आदी आस्थापनांचे ५०० हून अधिक कर्मचारी गेल्या ३ दिवसांपासून वेतनवाढीसाठी आंदोलन करत आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !