ईडीच्या कोलकातामध्ये ८ ठिकाणी धाडी

कोलकाता (बंगाल) – राज्यात २३ एप्रिलला होणार्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शहरात मोठी कारवाई केली. ईडीच्या अधिकार्यांनी शहरात ८ ठिकाणी एकाच वेळी धाड घातली. ही कारवाई कुख्यात गुन्हेगार बिस्वजीत पोद्दार उपाख्य ‘सोना पप्पू’, जय. एस्. कमदार आणि इतर यांच्या विरोधात चालू असलेल्या पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात करण्यात आली.
१. छापेमारीच्या वेळी अनुमाने १ कोटी ४७ लाख रुपये, ६७ कोटी ६४ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे, तसेच चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली.
२. शहरातील फर्न रोडवरील इमारतीत घाड घातल्यावर तेथे अमेरिकी बनावटीची पिस्तूल सापडली. पुढील कारवाईसाठी ती बंगाल पोलिसांच्या कह्यात देण्यात आली आहे.
३. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेकांच्या विरोधात प्रथम दर्शनी अहवाल सादर केला आहे. संबंधितांवर दंगल, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन यांसारखे गंभीर आरोप आहेत.
४. चौकशीत असे समोर आले की, बिस्वजीत पोद्दार उपाख्य ‘सोना पप्पू’ आणि त्याचे सहकारी संघटित गुन्हेगारी करून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा करत होते. खंडणी गोळा करणे, इतरांच्या भूमी कह्यात घेणे आणि अवैध बांधकाम, यांसारख्या मार्गांनी हा पैसा जमा केला जात होता.
५. ईडीने समन्स बजावूनही बिस्वजीत पोद्दार अद्याप चौकशीसाठी उपस्थित झालेला नाही. तो सध्या पसार असल्याचे सांगितले जात आहे.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक