
वाशी – लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या तुर्भे येथील ‘संत रामतनुमाता संवाद केंद्रा’ची दुरवस्था झाली आहे. या केंद्रात मद्यपी मेजवान्या झोडत आहेत. स्थानिक नगरसेवक, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये अप्रसन्नता आणि खेद आहे.
तुर्भे गावाच्या वेशीजवळ नवी मुंबई महानगरपालिकेने संत रामतनुमाता संवाद केंद्राची निर्मिती केली आहे. संत रामतनुमाता या तुर्भे गावातील होत्या. त्यामुळे तुर्भे गावासह ठाणे-बेलापूर पट्ट्यामधील सर्व गावांचे त्या मोठे श्रद्धास्थान आहेत. तुर्भे गावातील तलावाजवळ श्रीराम मंदिराच्या बाजूला त्यांचे समाधीस्थळही आहे. त्यामुळे तुर्भे गावातील माता-बाल रुग्णालयालाही संत रामतनुमाता यांचे नाव देण्यात आले आहे.
चांगल्या वास्तूंना संतांचे नाव देणे अपेक्षित असतांना काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींकडून ज्या ठिकाणी कोंडवाडा होता, त्याच्यात पालट करून त्या जागेवर संत रामतनुमाता संवाद केंद्राची निर्मिती करण्यात आली. गेली अनेक वर्षे ही जागा अशीच पडून होती. या ठिकाणी गर्दुल्ले आणि चरसी (चरस घेणारे) यांचा वावर होता. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने या जागेवर संवाद केंद्र बांधले. खुल्या असलेल्या या संवाद केंद्रामध्ये कोणतेही विशेष कार्यक्रम होत नाहीत. या केंद्राच्या समोरच देशी दारूचे दुकान आहे. परिणामी रात्रीच्या वेळी मद्यपी या केंद्रामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालतात. अनेकदा या ठिकाणी ते लघुशंकाही करतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणाहून स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका कर्मचारी, समाजसेवक यांची नेहमीच ये-जा असते. असे असतांनाही या मद्यपींना कुणीही हटकत नाही. परिणामी आता या मद्यपींचे इतके फावले आहे की, ते रात्रीसह दिवसाही येथे येऊन दारू पितात. या ठिकाणच्या लाद्या तुटल्या आहेत, तसेच सुशोभीकरणाची हानी करण्यात आली आहे. येथील छतही गायब झाले आहे. येथे स्वच्छताही होत नाही.
‘वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून तुर्भेकरांच्या धार्मिक श्रद्धा असलेल्या या केंद्राची स्थिती सुधारावी’, अशी मागणी केली जात आहे.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !