
नवी मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) – नवीन महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतर येथे मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसवण्यात आले आहेत. या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून लोकप्रतिनिधी, बोगस समाजसेवक, फेरीवाल्यांच्या हप्त्यावर श्रीमंत झालेले पालिका कर्मचारी यांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामे न करता हप्ते वसुली करून पोट भरत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
फेरीवाल्यांमुळे पादचार्यांना रस्ते आणि पदपथ यांवरून चालणे अवघड झाले आहे. अनेक फेरीवाल्यांकडे महानगरपालिकेचा परवाना नसल्याचेही आढळून येते. येथे उघड्यावर खाद्यान्न शिजवले जात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींची अनधिकृत फेरीवाल्यांना फूस असल्याचे दिसून येते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !