हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शिष्टमंडळाने घेतली ‘लव्ह जिहाद’ पीडित हिंदु कुटुंबाची भेट !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील ‘फिटनेस जिम’मध्ये झालेले लैंगिक शोषण आणि ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात समीर मुल्ला आणि त्याची बहीण तैसेम मुल्ला हे मुख्य सूत्रधार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे सोपवण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ या महिला शाखेच्या वतीने सौ. भव्या गौडा यांनी येथे केली. त्या हुब्बळ्ळीच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्यानंतर या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. तसेच रणरागिणी शिष्टमंडळाने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या पालकांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या वेळी उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या शकुंतला शेट्टी, ‘सोमवंश सहस्रार्जुन क्षत्रीय समाजा’च्या नेत्या सौ. नीता मेत्राणी, रणरागिणी गदग समन्वयक सौ. राणी चंदावरी, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि हिंदु नेते श्री. तेजस गौडा उपस्थित होते.
सौ. भव्या गौडा म्हणाल्या की, जिम चालवणारा समीर मुल्ला हिंदु मुलींशी मैत्री करून, त्यांना गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजून त्यांच्यावर बलात्कार करत असे, त्यांची नग्न छायाचित्रे काढून आणि व्हिडिओ बनवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करत असे आणि धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकत असे. समीर मुल्लाची बहीण तैसेम मुल्ला हिंदु मुलींची त्याच्याशी ओळख करून देऊन, फसवणुकीने प्रभाव पाडून त्यांना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवत असे. याच जिममध्ये दुसर्या एका जिहादी तरुणालासुद्धा अशाच पद्धतीचा अवलंब करून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे या घटनांचे गांभीर्य वाढले आहे, असे सौ. भव्या गौडा म्हणाल्या. अधिवक्त्या शकुंतला शेट्टी यांनी समीर मुल्ला, तैसेम मुल्ला आणि संबंधित जिम यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन