अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम

सांखळी, ५ एप्रिल – अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने वर्ष २०२५ मध्ये दीपावलीच्या निमित्ताने युवकांमध्ये शौर्यजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत लहान मुले, युवक कलाकार, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, तसेच शालेय विद्यार्थी मिळून एकूण १५४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत काणकोणपासून पेडणेपर्यंत सर्व १२ तालुक्यांमधील नागरिकांनी सहभाग घेतला. ‘किल्ले बनवा’ स्पर्धा ही समुदाय स्तरावरील स्पर्धा जिल्हा स्तरावर (उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा), तर वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धा तालुका स्तरावर घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना ३ एप्रिल या दिवशी रवींद्र भवन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

समुदाय स्तरावर दक्षिण गोवा जिल्हा स्तरावरील स्पर्धेत केपे येथील साईनाथ च्यारी यांना प्रथम, धारबांदोडा येथील सगुण पीरणकर यांना द्वितीय आणि सांगे येथील सुदेश गावकर यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. याखेरीज १० उत्तेजनार्थ पारितोषिके वितरित करण्यात आली. उत्तर गोवा जिल्हा स्तरावरील स्पर्धेत डिचोली येथील शैलेश जाधव यांना प्रथम, पेडणे येथील अर्चित परब यांना द्वितीय आणि डिचोली येथील साईश रावळ यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. याखेरीज १० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. वैयक्तिक घरगुती स्तरावरील स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली. याखेरीज कोरगाव येथे साकारण्यात आलेल्या भव्य किल्ल्याच्या देखाव्याला राज्यस्तरीय विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष