साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत, तसेच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातूनही वाचकांना त्यांची ओळख करून दिली आहे. आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्यासंदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके, तसेच ग्रंथ कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.
नियतकालिके/ग्रंथ पाठवतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. ही नियतकालिके/ग्रंथ मुद्दामहून खरेदी करून पाठवू नयेत.
२. नियतकालिके/ग्रंथ पाठवण्यापूर्वी ती सनातनकडे उपलब्ध आहेत का ?, याची निश्चिती करण्यासाठी खाली उल्लेख केलेल्या ई-मेल पत्त्यावर नियतकालिकांची/ ग्रंथांची यादी पाठवावी. यादी पाठवतांना नियतकालिक/ग्रंथाचे नाव, प्रकाशनाची दिनांक, पाठवणार्याचे नाव आणि संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करावा. संबंधित साधकांनी त्यासंदर्भात परत निरोप दिल्यावरच ती नियतकालिके/ग्रंथ गोवा येथील मुख्य कार्यालयात पाठवावीत.
३. ही नियतकालिके मुद्दामहून खर्च करून पोस्टाने पाठवू नये. आपल्या भागातून कुणी साधक गोवा येथे येत असल्यास त्यांच्या मार्फत किंवा सनातनच्या जवळील सेवाकेंद्रात जमा करावीत.
साधकाचे नाव आणि इमेल पत्ता
श्री. अमोल बधाले,
[email protected]
‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
उघड्यावर कचरा टाकणार्यांवर कडक कारवाई करण्याची सिद्धता !