
नवी मुंबई – फळ बाजारामध्ये निर्यात भवनामागे स्वयंपाकाच्या चुलीतील विस्तवामुळे जवळील पालापाचोळा पेटून आग लागल्याची घटना दुपारी घडली. सुदैवाने ही आग वेळीच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
‘मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती’च्या बाजारामध्ये सध्या आंब्याचा हंगाम चालू झाला आहे. यामुळे ‘निर्यात भवन’मध्ये मोठ्या प्रमाणात आंबा बांधणीसाठी गवत, पुठ्ठ्याचे खोके, तसेच लाकडी खोके यांचा वापर केला जात आहे. निर्यात भवनामध्ये आंबा पिकवण्यासाठी ‘रॅपलिंग चेंबर’सुद्धा (रॅपलिंग चेंबर म्हणजे फळे नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठीची बंद खोली) आहेत. या चेंबर्सला वातानुकूलित यंत्रणा आहे. काही आस्थापनांकडून ही यंत्रणा ‘निर्यात भवना’च्या मागील मोकळ्या जागेमध्ये बसवण्यात आली आहे. याच यंत्रणांच्या लगत येथील काही कामगारांकडून स्वयंपाकासाठी चुली मांडण्यात आल्या आहेत. अशाच एका चुलीतील विस्तव पूर्णपणे न विझवता सदर कामगार कामावर निघून गेले होते. दुपारच्या वेळी चुलीतील विस्तवाने जवळील पालापाचोळा आणि कचरा पेटला. परिणामी काही क्षणात मोठी आग लागली.
आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर आग पाण्याने विझवली. फळ बाजरामध्ये आग विझवण्याची यंत्रणा, तसेच अतिरिक्त जलवाहिनी नसल्याने जवळील गोडाऊन मधील शौचालयाच्या पाण्याने आग विझविली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती, तर जवळील रॅपलिंग चेंबर आणि त्याची वातानूकुलित यंत्रणा काही क्षणात भस्मसात् होऊन कोट्यवधी रुपयांची हानी झाली असती.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !