म्हापसा बाजारात एका रात्रीत ६ दुकाने फोडली

प्रतिकात्मक चित्र

म्हापसा – सतत वर्दळ असलेल्या येथील बाजारातील ६ दुकाने २ एप्रिलच्या रात्री फोडून चोरट्यांनी आतील रोख रक्कम पळवण्यात आली आहे. ३ एप्रिलला सकाळी दुकाने उघडण्यासाठी दुकानमालक आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सीसीटिव्ही चित्रीकरणाच्या आधारे ते चोरट्यांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत  आहेत. या घटनेमुळे येथील व्यापार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली असून सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे.