भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन छताच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मंदिर प्रशासनाच्या विरोधात तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे.
चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर नामदेव पायरी ते महाद्वार पोलीस चौकी यामध्ये तात्पुरते छत उभारण्यात आले होते; मात्र पावसात ते टिकू शकले नाही. छतामधील बांबू आणि कापड खाली आल्याने भाविकांत भीती पसरली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी लहान मुले आणि वृद्ध भाविक यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला असून कामात हलक्या दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ‘सामान्य पावसात अशी अवस्था होत असेल, तर मोठ्या दुर्घटनेचे दायित्व कोण घेणार?’, असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पंढरपूरकरांकडून करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन मागणी केल्याविना काम करत नाही का ? – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक