
छत्रपती संभाजीनगर – येथे विविध दुकानांमध्ये पोलिसांनी घातलेल्या धाडीत बंदी असलेल्या ‘मल्लिका’, ‘झलक’, ‘गोरे’, ‘गोल्डन पर्ल’, ‘चांदणी’, ‘उजूबा’, ‘फेस फ्रेश’, ‘नूर हर्बल’, ‘न्यू फेस ब्युटी क्रीम’ यांसह विविध पाकिस्तानी क्रीम जप्त करण्यात आली. गोरे होण्यासाठी वापरल्या जाणार्या या सौंदर्यप्रसाधनांमुळे त्वचा, तसेच थेट मूत्रपिंडावर (‘किडनी’वर) परिणाम होत असल्याचे तज्ञ आधुनिक वैद्यांनी सांगितले आहे. ‘पारले गोल्ड’, ‘गोरे साबण’ आणि ‘मल्लिका व्हिटॅमिन सी सिरम’ यांचाही जप्त केलेल्या उत्पादनांत समावेश आहे.
🚨 Banned Pakistani cosmetics seized in Chhatrapati Sambhajinagar! 🚨
Despite a strict ban, how is the black marketing of these products still thriving?
How are these items even crossing the border into India? 📦🚫
Strict action must be taken against sellers playing with… pic.twitter.com/K253LfdKYK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 2, 2026
येथील सिटी चौक येथे पोलिसांनी घातलेल्या धाडीत ६० सहस्र रुपयांची क्रीम, साबण, सिरम जप्त केले आहे. बंदी असलेल्या पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांची विक्री चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील दुकानांवर कारवाई केली. ‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला. प्रसाधनांच्या संदर्भात युवकांनी आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी दिल्या होत्या.
संपादकीय भूमिका :
|
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद