
सातारा, २८ मार्च (वार्ता.) – सातारा शहरातून जाणार्या प्रस्तावित ‘रिंगरोड’चे (शहराभोवती वर्तुळाकार पद्धतीने बांधलेला रस्ता) रेखांकन पूर्ण झाले असून प्रशासकीय पातळीवर या कामाची सिद्धता चालू झाली आहे. रिंगरोडसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाचे उत्तरदायित्व सातारा नगर परिषदेचे आहे. या कामासाठी अनुमाने २० कोटी रुपये व्यय होणार आहेत; मात्र यामुळे कास, बामनोली, ठोसेघर या ठिकाणी जाणार्या पर्यटकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शासकीय विश्रामगृहामध्ये नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
मंत्री भोसले म्हणाले, ‘‘ हा रिंगरोड शाहूनगरमार्गे अजिंक्यतारा, आदालत वाड्याची पाठीमागची बाजू येथून पावर हाऊस आणि महादरे, पेढ्याचा भैरोबामार्गे मेढ्याच्या जुन्या रस्त्याला जोडला जाईल. रिंगरोडचे संपूर्ण काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येईल.’’
सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित स्मारके आणि विकासकामे लवकरच मार्गी लावणार !सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित स्मारके आणि विकासकामे याविषयी मंत्री भोसले म्हणाले, ‘‘किल्ले अजिंक्यतारा, महाराणी ताराराणी यांची समाधी, मुनावळे ते वासोटा ‘रोप-वे’, दरे येथे निसर्गोपचार केंद्र, कटगुण येथे महात्मा फुले यांचे, तर नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ही सर्व स्मारके आणि विकास कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत.’’ |
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र