
दोहा (कतार) – येथील उच्च न्यायालयाने माजी भारतीय नौदल कमांडर पूर्णेंदु तिवारी (वय ६५ वर्षे) यांना आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात निर्दोष ठरवले आहे; परंतु तरीही अद्याप त्यांना भारतात परत पाठवण्यात आलेले नाही. पूर्णेंदु तिवारी हे त्या ८ माजी भारतीय नौदल अधिकार्यांपैकी एक आहेत, ज्यांना कथित गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. १२ मार्च या दिवशी दिलेल्या निकालात न्यायालयाने सर्व आरोपांतून त्यांची मुक्तता केली. ‘सर्व व्यवहार तक्रारदाराच्या संमतीने झाले होते आणि त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता’, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर या ८ अधिकार्यांना क्षमा करण्यात आली होती; मात्र अद्याप पूर्णेंदु तिवारी यांची सुटका करण्यात आलेली नाही.
कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तिवारी यांच्यासमवेत अटक करण्यात आलेले इतर ७ भारतीय परतले आहेत; मात्र २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही पूर्णेंदु तिवारी यांची सुटका झालेली नाही. दोहा येथील कारागृह अमेरिकेशी संबंधित इमारतींच्या जवळ असून त्या परिसरावर इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन आक्रमणे होत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
कोण आहेत पूर्णेंदु तिवारी ?
भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर पूर्णेंदु तिवारी यांनी ‘दहरा ग्लोबल कंपनी’त काम चालू केले होते. हे आस्थापन कतारच्या नौदलाला प्रशिक्षण देण्याचे काम करते. तिवारी हे नौवहन तज्ञ असून त्यांनी भारतीय नौदलाच्या आय.एन्.एस्. मगर या युद्धनौकेचे नेतृत्व केले आहे. मीतू तिवारी यांनी ‘दहरा ग्लोबल कंपनी’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यावर आरोप केला की, त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांच्या भावावर आरोप करण्यात आले.
रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले