
पंढरपूर – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभामंडपात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता श्री विठ्ठलास महानैवेद्य अर्पण करून पांढरा पोशाख, पागोटे आणि साखरेचा हार घालून श्रींच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

या वेळी श्री विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) यांच्या वतीने ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर भाविकांना सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रबंधक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा आदींसह कर्मचारी उपस्थित होते. त्या वेळी रामनवमीनिमित्त संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रात भोजनप्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. सुमारे २ सहस्र भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती प्रबंधक संदेश भोसले यांनी दिली.

ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !