अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकावून सलग ४ महिने बलात्कार !

इंदूर (मध्यप्रदेश) – इंदूर येथे एका हिंदु तरुणीला ‘ब्लॅकमेल’ करून तिच्यावर ४ महिने सलग बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सईद खान असे आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे.
१. पीडित हिंदु तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, ४ महिन्यांपूर्वी ती गुजरखेडा येथे डॉ. सईद खान याच्या दवाखान्यात उपचारांसाठी गेली होती. तेथे डॉक्टरने तिला नशेचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि बलात्कार करून आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. त्यानंतर तो सातत्याने तिला ‘ब्लॅकमेल’ करत होता.
२. २२ मार्चला आरोपीने पीडित तरुणीला पातालपाणी येथील बेलामोर ‘रिसॉर्ट’मध्ये बोलावले. याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तेथे पोचले. एका खोलीतून त्यांनी आरोपीला तरुणीसह पकडले. त्यानंतर आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले.
३. त्याच दिवशी उशिरा पीडित तरुणीचे नातेवाईक, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि गावकरी आरोपीच्या आम्बाचंदन येथील घराजवळ जमा झाले. मुलीवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ त्यांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली. त्यानंतर गुजरखेड़ा येथील आरोपीच्या बंद दवाखान्यावर दगडफेक केली.
४. याविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि जमावाला पांगवले. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
५. बडगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश वास्कले यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि ‘ब्लॅकमेलिंग’ या कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिका
|
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण