
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन, परंपरा संवर्धन आणि देवस्थानांचे विविध प्रश्न यांवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने २२ मार्च या दिवशी सातारा येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस राज्यातून विविध मंदिरांचे मानकरी, विश्वस्त, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या परिषदेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध देवस्थानांचे मानकरी, विश्वस्त आणि पदाधिकारी, असे एकूण १३० जण सातारा येथे जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.

यामध्ये वेतोबा देवस्थान, आरवली; आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर, श्री साई दरबार मंदिर, कविलकट्टा, कुडाळ; श्री देवी भगवती देवस्थान, मुणगे; श्री सातेरी मंदिर, अणसूर; श्री बांदेश्वर मंदिर, बांदा; श्री भावईदेवी मंदिर, कुणकेरी; श्री देवी माऊली मंदिर, रोणापाल; श्री स्वयंभू मंदिर, केसरी यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत.



वसईतील कोळीवाड्यांना गावठाणचा दर्जा देणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सिंहस्थ कुंभपर्वासाठी नाशिक येथे तात्पुरते उपजिल्हाधिकारी नेमणार !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
श्री सत्यसाईबाबांच्या रथासह चरण पादुकांचा नगर शहरासह उपनगरांत विहार
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान