
चिंचवड (जिल्हा पुणे) – हिंदु नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त चिंचवड येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत राष्ट्रसेविका समिती, सनातन संस्था, शंकर महाराज सेवा मंडळ, प्रजापती ब्रह्मकुमारी, जीवन विद्या मिशन, विवेकानंद केंद्र यांसह विविध भजनी मंडळे, सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीधरनगर येथील दत्तमंदिर येथे धर्मग्रंथ पूजन आणि आरती करून सायंकाळी ५.३० वाजता शोभायात्रेला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.


शोभायात्रेत प्रभु श्रीरामाची प्रतिमा असलेला सुशोभित रथ आणि विविध पारंपरिक वेशभूषेतील मुले अन् नागरिक आकर्षणाचे केंद्र ठरले होते. मार्गवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. श्री धनेश्वर मंदिर येथे आरतीने सांगता झाली. आयोजक श्री. अजित जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी शिस्तबद्ध नियोजनासाठी पोलिसांचे विशेष सहकार्य लाभल्याचे नमूद करत त्यांचा सत्कारही करण्यात आला.

पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक