
सातारा, २१ मार्च (वार्ता.) – घरगुती गॅस पुरवठ्यावर केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष असून सातारा जिल्ह्यासाठी घरगुती गॅस सिलिंडर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. गॅस वितरकांकडून घरपोच गॅस सिलिंडर देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी गॅस वितरण केंद्राच्या बाहेर रांगा लावू नयेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच गॅस वितरणात अडथळा आणू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
| घरगुती गॅस हा व्यावसायिक कारणांसाठी वापरू नये. शैक्षणिक संस्था, आश्रम शाळा, रुग्णालये यांना पुरेशा प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरीत करण्यात येत आहेत. कुणी घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करीत असल्यास जिल्हा पुरवठा विभाग आणि तालुकास्तरीय पुरवठा विभाग यांना त्वरित कळवावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने यांनी केले आहे. |
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !