चिपी विमानतळासाठी ‘व्हिजीएफ्’ देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता !
(व्हिजीएफ् – ‘व्हायेबिलिटी गॅप फंडिंग’ म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पांना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी सरकारद्वारे दिले जाणारे आर्थिक अनुदान)

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गवासीय आणि पर्यटक यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस चालू रहाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायेबिलिटी गॅप फंडिंग’ देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. देश-विदेशातील पर्यटक येथील पर्यटन अनुभवण्यासाठी येत असतात; मात्र सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता. आता या शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणार्या पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खासगी टॅक्सीचालकांना याचा मोठा लाभ होईल. मुंबई-सिंधुदुर्ग आकाश मार्गावर प्रतिदिन विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास साहाय्य होईल. सण-उत्सवांच्या काळात सिंधुदुर्गवासियांना आता प्रवासाचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध असेल, तसेच तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणार्या रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा