
कोल्हापूर – जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पहायला मिळत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच नोंदणी करावी. जिल्ह्यात प्रतिदिन ६५ सहस्र सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाईची भीती न बाळगता आवश्यक असेल तेव्हाच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले आहे.
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस आणि इंधन टंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री आबीटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी विविध लोकप्रतिनिधी, तसेच संबंधित गॅस आस्थापनांचे प्रमुख आणि पुरवठादार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर पुनर्विकास आणि सुधारणा प्रकल्पाची उद्दिष्ट्ये बैठकीत मांडली.
यात पुरेशी वाहतूक नियंत्रण व्यवस्था निर्माण करणे, दर्शन रांगांचे नियोजन सुधारणे आणि भाविकांच्या महाप्रसादासाठी अन् विश्रांतीसाठी समर्पित ठिकाणे स्थापित करणे अशा विषयांचा समावेश होता. यावर पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी स्पष्ट केले की, या आराखड्याची कार्यवाही सर्व घटकांच्या समन्वयातूनच केली जाईल.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बैठकीत माहिती देतांना सांगितले की, जिल्ह्यात एकूण ११२ गॅस आस्थापना असून ११ लाख ५० सहस्र घरगुती गॅस जोडण्या आहेत, तर ११ सहस्रांहून अधिक ग्राहकांना वाहिनीद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणात एकाच वेळी नोंदणी झाल्याने काही काळासाठी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता; मात्र ते आता पूर्ववत् करण्यात आले आहे.
| श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान विकास आराखड्याचा आढावा !
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर पुनर्विकास आणि सुधारणा प्रकल्पाची उद्दिष्ट्ये बैठकीत मांडली. सादरीकरणाद्वारे प्रत्येक प्रस्तावित कामावर चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली जाईल आणि स्थानिक नागरिकांच्या सहमतीनेच सर्व निर्णय घेतले जातील, असे सांगितले. मोठ्या प्रमाणात वाहनतळांची निर्मिती आवश्यक असल्याने बैठकीत प्रस्तावित विविध जागांवर चर्चा करण्यात आली. |
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद