५ वर्षांत अनधिकृत नोकरभरती दलालांच्या विरोधात २७ तक्रारी

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – गोव्यात विदेशी नोकरभरती घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्यात वर्ष २०२१ ते जानेवारी २०२५ या कालावधीत अनधिकृत नोकरभरती दलालांच्या विरोधात २७ तक्रारी नोंद झालेल्या आहेत. सरकारने गोवा विधानसभेत कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या एका प्रश्नावरील लेखी उत्तरात गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘नोकरभरती दलालांच्या विरोधात करण्यात आलेल्या अनेक तक्रारींचे अन्वेषण चालू आहे, तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तीला अमेरिका, इस्रायल किंवा थायलंड आदी ठिकाणी नोकरीचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. ‘परदेश स्थलांतर कायद्या’च्या अंतर्गत गोव्यात विदेशात नोकरभरतीसंबंधी अधिकृत १२ एजंसी आहेत. सरकार अशा प्रकरणांवर देखरेख ठेवून असते, तसेच नागरिकांनी विदेशात नोकरीसाठी अर्ज करतांना अधिकृत एजंटकडेच जाणे अपेक्षित आहे.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत