
मुंबई – भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करून नुकताच ‘टी-२०’ क्रिकेट स्पर्धेमध्ये विश्वचषक जिंकला. १४ मार्च या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊन ‘विश्वचषक’ श्री गणेशाच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतला.
या वेळी पुरोहितांनी वेदपठण करत ‘विश्वचषक’ श्री गणेशाच्या चरणी अर्पण करून आशीर्वादरूपी शाल, पुष्पहार आणि प्रसाद त्यांना दिला. या वेळी उपस्थित भाविकांनी ‘गणपति बाप्पा मोरया’ असा जयघोष आणि ‘भारतमाता की जय’ असा घोष केला.
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, कार्यकारी अधिकारी वीणा पाटील, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप राठोड यांसह अन्य पदाधिकार्यांनी त्यांचा सन्मान केला.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन