विवाह सोहळ्याच्या वेळी ६३ वर्षीय व्यक्तीकडून हत्या करण्याचा प्रयत्न
जम्मू (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर ११ मार्चच्या रात्री एका विवाह सोहळ्याच्या वेळी ६३ वर्षीय कमल सिंह नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. सुदैवाने गोळी त्यांना लागली नाही. याच वेळी डॉ. अब्दुल्ला यांच्या सुरक्षारक्षकांनी तातडीने कारवाई करत गोळीबार करणार्याला पकडले. घटनेच्या वेळी डॉ. अब्दुल्ला यांच्या समवेत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हेही होते. पोलीस या आक्रमणाचे कारण शोधत आहेत.
१. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले आहे. यात दिसू शकते की, आक्रमण करणारा कमल सिंह जामवाल याने मागून येऊन फारूख यांच्या डोक्यावर बंदूक रोखली. सुरक्षारक्षकांनी सिंह यांचा हात बाजूला केला, त्यामुळे गोळी हवेत गेली.
२. फारूख अब्दुल्ला, सुरिंदर चौधरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अन्य वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सुरजित सिंह यांच्या मुलाच्या विवाहात सहभागी झाले होते. गोळीबार करणारा कमल सिंह सुरजित सिंह यांचा चुलत भाऊ आहे. तो व्यावसायिक आहे आणि जुन्या शहरात त्याची काही दुकाने आहेत.
३. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल सिंह याच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून परवानाधारक शस्त्र आहे.
२० वर्षांपासून फारूख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न करत होतो ! – आरोपीची स्वीकृती
आरोपी कमल सिंह जमवाल जम्मूचाच रहिवासी आहे. त्याने मान्य म्हटले की, मी गेल्या २० वर्षांपासून फारूख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न करत होतो.
‘झेड प्लस’ सुरक्षा असतांना पिस्तूल घेऊन कुणी जवळ कसा येतो ?- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा प्रश्न
डॉ. फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर लिहिले की, एक व्यक्ती पिस्तूल घेऊन अगदी जवळ आली आणि गोळी झाडली. अल्लाचे आभार की, माझे वडील थोडक्यात बचावले. प्रश्न असा निर्माण होतो की, झेड प्लस आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड संरक्षित माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ कुणी कसे पोचले ? या व्यक्तीला मी ओळखतही नाही.
खूप मोठी सुरक्षा चूक ! – उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी
उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी म्हणाले की, इतकी मोठी चूक कशी झाली ? हे पोलिसांना विचारले पाहिजे. तिथे स्थानिक पोलिसांपैकी कुणीही नव्हते. सुरक्षाव्यवस्थेत ही अतिशय मोठी चूक आहे.

शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !