गोवा विधानसभा अधिवेशन

उत्तर आणि दक्षिण गोव्यात उभारणार अत्याधुनिक प्रयोगशाळा
पणजी, ११ मार्च (वार्ता.) – गोव्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जलस्रोत खाते आता विशेष प्रयत्न करणार आहे. गोव्यात प्रतिवर्ष सुमारे १२० इंच पाऊस पडतो, तरीही नदी आणि नाले यांचे प्रदूषण होते. पावसाळा संपल्यानंतर मे मासापर्यंत नाले प्रदूषित होतात. सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने नाले प्रदूषित होतात. नाले पुढे नदीला जोडलेले असल्याने नदीही प्रदूषित होते. यावर उपाययोजना म्हणून राज्यातील प्रत्येक विभागात एका विशेष उपविभागाची स्थापना केली जाणार आहे आणि हा उपविभाग नाल्यांमधील प्रदूषणाचे सखोल विश्लेषण करणार आहे. यानंतर प्रत्येक मासाला नाल्यांच्या प्रदूषणाचा अहवाल प्रसिद्ध करून तो संबंधितांना पाठवण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्यात २ स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी विरोधी पक्षातील आमदारांनी राज्यातील प्रमुख नद्या आणि नाले यांच्या वाढत्या प्रदूषणाविषयी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री सुभाष शिरोडकर पुढे म्हणाले, ‘‘सांडपाणी आणि इतर प्रदूषित द्रव्ये थेट नाल्याद्वारे नद्यांमध्ये सोडल्यामुळे गोव्यातील मांडवी, झुवारी आणि साळ यांसह तब्बल ११ प्रमुख नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार सर्वसमावेशक आराखडा सिद्ध करत आहे.’’ प्रारंभी प्रश्न करतांना काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले, ‘‘देशातील एकूण ३२३ प्रदूषित नद्यांमध्ये गोव्यातील या नद्यांचा समावेश होणे, ही एक चिंतेची गोष्ट आहे. राज्यातील ७५ टक्के जलस्रोत प्रदूषित झाले आहेत.’’
संपादकीय भूमिका :गोव्यात केवळ बांधकामे केली जात आहेत; पण त्यामुळे निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाकडे उपाययोजना आहे का ? हा प्रश्न आहे. |
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !