
पणजी, १० मार्च (वार्ता.) – राज्यातील बहुचर्चित ‘युनिटी मॉल’ प्रकल्प रहित झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत बोलतांना हा प्रकल्प निश्चितपणे पूर्ण केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘सध्या सरकारकडून या प्रकल्पासाठी नवीन जागेचा शोध चालू आहे. प्रशासकीय स्तरावर नवीन जागेच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे.’’ विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी प्रश्नोत्तर तासाच्या वेळी विचारलेल्या संयुक्त प्रश्नाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे उत्तर देत होते.
चिंबल येथे ‘युनिटी मॉल’ आणि ‘प्रशासकीय स्तंभ’ हा प्रकल्प उभारण्यास स्थानिक नागरिक अन् राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध झाल्यानंतर सरकारने तो अन्यत्र हालवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे पुढे म्हणाले, ‘‘चिंबल येथील प्रस्तावित प्रकल्प स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन रहित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत केवळ ७ कोटी १० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर कंत्राटदाराने स्टील आणि इतर साहित्य खरेदी यांच्यासाठी ११ कोटी ६३ लक्ष रुपयांचे देयक सरकारला सुपुर्द केले आहे; मात्र हे देयक चुकते करण्यात आलेले नाही. जे साहित्य चिंबल येथे प्रस्तावित प्रकल्पासाठी वापरले जाणार होते, ते आता नवीन ठिकाणच्या प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी होता. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांतही ‘युनिटी मॉल’चे काम चालू झालेले आहे. हा प्रकल्प चिंबल येथे झाला असता, तर चिंबल भागाचा कायापालट झाला असता. स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता; मात्र या प्रकल्पावरून राजकारण करण्यात आले.’’
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !