
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी एम्. देवेंद्र सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती विधानसभेचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबन मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
एम्. देवेंद्र सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच पुराव्यांसह लेखी माहिती दिली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एम्. देवेंद्र सिंह यांच्या निलंबनाचा आदेश तालिका सभापतीकडून देण्यात आला होता. एम्. देवेंद्र सिंह यांच्याकडून कोणता अनुचित प्रकार घडला असल्यास त्यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे पर्यावरण विभागाच्या अखत्यारित येते.
सभागृह चालू होण्यापूर्वी त्याविषयीची माहिती घेण्यासाठी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी एम्.देवेंद्र सिंह यांना विधानभवनामध्ये बोलावले होते. मंत्र्यांनी बोलावूनही ते अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
१ लाख २५ सहस्र रुपयांची लाच मागणारा ठाणे येथील कार्यालय अधीक्षक कह्यात
वसईतील कोळीवाड्यांना गावठाणचा दर्जा देणार ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सिंहस्थ कुंभपर्वासाठी नाशिक येथे तात्पुरते उपजिल्हाधिकारी नेमणार !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !