
सांगली – मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यातील ३०० पेक्षा अधिक नागरिक दुबईत अडकले आहेत. इराण-अमेरिका संघर्षामुळे विमानसेवा बंद झाली असून नागरिकांचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. भारत सरकारने हस्तक्षेप करून विशेष विमानसेवा किंवा पर्यायी व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणावे, अशी मागणी केली आहे. अडकलेल्या नागरिकांमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, धुळे, जळगाव, पुणे, बारामती येथील नागरिक आहेत. स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक सुविधा आणि साहाय्य दिले जात आहे. भारत सरकारने हस्तक्षेप करून विशेष विमानसेवेची मागणी केली आहे. आखातातून काही विमानांतून नागरिक परत आले आहेत. अधिक माहितीसाठी नियंत्रण संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (मंत्रालय नियंत्रण कक्ष क्र. ९३२१५८७१४३, व्हॉट्सॲप क्र. +९७१५०३६५४३५७)
| युद्धामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी भारतीय विमान आस्थापनांना उड्डाणे वाढवण्याचे आदेश दिले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना साहाय्य करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विशेष आणि नियमित उड्डाणांचे नवीन वेळापत्रक घोषित केले आहे. ५ मार्चच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकृत माहितीनुसार ‘इंद्रजीत स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज्’चे ८४ विद्यार्थी आणि ४ शिक्षक यांसह पुणे येथील १११ नागरिक सुरक्षितपणे दुबईतून परतले आहेत, तसेच सांगली येथील ४७ नागरिक परत आले आहेत. |
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी