इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मद्य पाजून अत्याचार !

इगतपुरी (जिल्हा नाशिक) येथील घटना !

नाशिक – येथे इगतपुरीमध्ये अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केले. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांना गुंगीचे औषध आणि मद्य पाजून अत्याचार केले. (अल्पवयिनांकडे गुंगीचे औषध किंवा मद्य येते कुठून ? हे साहित्य त्यांना पुरवणार्‍यांचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक) इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात हा प्रकार घडला. संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. इगतपुरी पोलिसांनी मात्र तक्रार प्रविष्ट करण्यात टाळाटाळ केली. (पोलिसांची ही भूमिका संशयास्पद नव्हे का ? कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांना बडतर्फ का करू नये ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

अल्पवयीन मुलांमध्ये असे प्रकार होणे विकसित होऊ पहाणार्‍या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. पालकांचे मुलांवर नियंत्रण नसल्याचाच हा परिणाम आहे !