
तुळजापूर/अक्कलकोट – हुताशनी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे पारंपरिक पद्धतीने होलिकादहनाचा सोहळा भक्तीभावाने पार पडला. तुळजापूर येथे मंदिर परिसरातील होमकुंडासमोर विधीवत् होळी पूजन करण्यात आले. मंदिरातील पूजनानंतरच शहरात घरोघरी होळी साजरी करण्याची परंपरा असल्याने पूजनानंतर सर्वत्र होळी साजरी करण्यात आली.

हुताशनी पौर्णिमेनिमित्त सायंकाळच्या अभिषेक पूजेची वेळ पालटून ती सायंकाळी ६ वाजता करण्यात आली होती. त्यानंतर देवीची आरती आणि धूप आरती करण्यात आली. या प्रसंगी मंदिराचे पदाधिकारी, कर्मचारी, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अक्कलकोट येथे अन्नछत्र मंडळाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते होळी पूजन करण्यात आले, तर विधीवत् पूजन पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांनी केले. मंडळ गेल्या ३८ वर्षांपासून विविध सण-उत्सव भक्तीभावाने साजरे करत असून या वेळीही पदाधिकारी, सेवेकरी आणि भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !