राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैद्य रामदास आव्हाड यांना ‘आयुर्वेद गौरव पुरस्कार’ प्रदान

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना वैद्य रामदास आव्हाड

शेगाव – भारत सरकारचे आयुष मंत्रालय आणि ‘अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन’ यांच्या वतीने शेगाव येथे नुकतेच ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’चे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदरणीय वैद्य रामदास आव्हाड यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अतुलनीय कार्याविषयी ‘आयुर्वेद गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत, आयुष राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव आणि अन्य मान्यवरांसह ६ सहस्रांहून अधिक विद्यार्थी अन् डॉक्टर उपस्थित होते.

‘भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आजपर्यंतचा सर्वोच्च सन्मान मिळणे, ही आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कामाची पावती आहे’, असा उत्स्फूर्त अभिप्राय वैद्य रामदास आव्हाड यांनी या वेळी दिला.