
नवी मुंबई – ‘हिंद-दी-चादर’(भारताची ढाल) श्री गुरु तेग बहाद्दूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथसाहिब यांच्या शिकवणीनुसार समता आणि मानवता यांचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध समाजांच्या सहभागामुळे हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न रहाता सामाजिक सलोख्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.
यामध्ये ९ समाजांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्य दिसून आले. २० लाख नागरिक २ दिवसांत या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजांतील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधुता आणि मानवता यांचा संदेश दिला.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !