पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्याचे पुणे महानगरपालिकेचे आवाहन !

होळीसाठी वृक्षतोड केल्यास एक लाख रुपयांचा दंड !

पुणे – विनाअनुमती झाडे तोडणे, जाळणे किंवा झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करणे, हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी पुणे महानगरपालिकेने दिली आहे. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम २०२१’ नुसार अनुमतीविना वृक्षतोड केल्यास संबंधित झाडाच्या मूल्याइतका दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड एक लाख रुपयांपर्यंत असू शकतो. त्यामुळे ‘होळीच्या निमित्ताने वृक्षतोड करू नये’, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. ‘पर्यावरणपूरक पद्धतीने होळी सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि शहरातील झाडांचे संरक्षण करावे’, असे आवाहन उद्यान विभागप्रमुख अशोक घोरपडे यांनी केले आहे. (वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रयत्नरत मंडळी वर्षभर व्यवसाय-उद्योग यांसाठी बेसुमार वृक्षतोड होते, तेव्हा काय करतात ? हिंदु सणांची अपकीर्ती करण्यासाठीच अशी अर्थहीन आवाहने केली जातात, हे हिंदू जाणून आहेत. – संपादक)