
डोंबिवली – येथील ज्येष्ठ वेदमूर्ती आणि प्रख्यात भविष्यकार लक्ष्मण कृष्णाजी पारेकर (वय ६८ वर्षे) यांचे २७ फेब्रुवारीला त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पारेकरगुरुजी ‘शास्त्री’ या नावाने ते डोंबिवलीसह राज्यभर परिचित होते.
मूळचे पंढरपूर येथील रहिवासी असलेले पारेकरगुरुजी गेली ४ दशके डोंबिवली परिसरात पौरोहित्य आणि ज्योतिष सेवा देत होते. शालेय शिक्षणासह त्यांनी वेदपठण, पुराण आणि धर्मशास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला होता. वेद आणि शास्त्रे यांच्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक त्यांच्या भेटीस येत असत. धार्मिक विधींची शास्त्रोक्त मांडणी हा त्यांचा हातखंडा होता.
बापूसाहेब फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर संस्थानच्या पर्यावरण समितीचे ते सदस्य होते. मंदिरातील निर्माल्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि त्याचे पर्यावरणपूरक विघटन यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. कौपिनेश्वर मंदिरासमोरील विठ्ठल मंदिरात त्यांनी सलग ६ वर्षे चातुर्मास प्रवचने दिली. श्रीमद्भागवत पारायणे आणि अखिल भारतीय ज्योतिष संमेलने येथे व्याख्याने देत त्यांनी धर्मशास्त्र, हिंदु परंपरा आणि संस्कार यांवर प्रभावी मांडणी केली.
नवोदित विद्यार्थ्यांना वेदपठण आणि धर्मशास्त्र यांचे प्रशिक्षण देत त्यांनी शेकडो पुरोहित घडवले. त्यांच्या निधनाने डोंबिवलीतील धार्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन