टिपू सुलतान, औरंगजेब, अफझलखान, तसेच बाँबस्फोट करणारे यांचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मद्रोही टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. टिपू सुलतान, औरंगजेब, अफझलखान, तसेच बाँबस्फोट करणारे यांचे उदात्तीकरण करणे दुर्दैवी आहे. प्रतापगडावरील अतिक्रमण काढायला धाडस लागते. आमच्यात धाडस आहे; म्हणून आम्हाला किंमत आहे. इतकी वर्षे ते अतिक्रमण काढायची कुणाचे धैर्य होते का ? त्याला वाघाचे काळीज अन् धाडस लागते. स्वाभिमान लागतो तो आम्ही दाखवला. मतांचे राजकारण कधीही करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.