Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणखी ६ शहरांसाठी उड्डाणे चालू होणार !

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २९ मार्चपासून इंडिगो आस्थापन ६ महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा चालू करणार आहे. नवी मुंबई विमानतळ आता देशातील ‘टियर-२’ आणि ‘टियर-३’ शहरांशी थेट जोडले जाणार आहे. यामध्ये कर्णावती, राजकोट, दीव, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा या शहरांचा समावेश आहे. (टियर-२ शहरांत महानगरांच्या तुलनेत (टियर-१ शहरांच्या तुलनेत) अल्प मूल्यात रहाता येते, परंतु ती झपाट्याने विकसित होत आहेत, तर ‘टियर-३’ शहरे ही विकसित होत असलेली आणि १० लाखांपेक्षा अल्प लोकसंख्येची शहरे होय.)

१ फेब्रुवारीपासून येथे २४ घंटे विमान उड्डाणे चालू झाली असून विमानांच्या संख्येतही वाढ करण्यात येत आहे. प्रवासी वाहतुकीसह येथून मालवाहतूक विमानसेवाही चालू होणार आहे.