
कोटा (राजस्थान) – समाज कधी समान विचारांनी, तर कधी दुःख आणि संकट यांमुळे संघटित होतो. ज्या लोकांना आज समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटित होण्याचे महत्त्व समजत नाही, त्यांनाही प्रतिकूल परिस्थितीत त्याचे महत्त्व समजेल. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सतत प्रयत्न करत रहाणे, हा समाजनिर्मितीचा मूलमंत्र आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथे नुकतीच महाराष्ट्रीय समुदायाच्या पदाधिकार्यांची एक बैठक झाली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया अन् सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या पत्नी डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे याही उपस्थित होत्या.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘समाजासाठी काम करतांना अनेक समस्या आणि आव्हाने यांना तोंड द्यावे लागते. सकारात्मक विचार आणि उदात्त कार्य स्वतःचे घर अन् समाज येथूनच चालू करावी लागतात. त्यामुळे संघर्ष होणे स्वाभाविक आहे. प्रभु श्रीराम, कौरव-पांडव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे आपल्याला संघर्षाचा आदर्श मार्ग शिकवतात. हा मार्ग आपल्याला समाज, संस्कृती आणि धर्म यांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देतो. दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाष संच आणि ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ यांवरील आकर्षणामुळे कुटुंब, पालक अन् समाज यांचे महत्त्व न्यून होत आहे. कठीण काळात आत्मबळ आणि कुटुंब अन् समाज यांच्याकडून मिळणारे मनोबल यांचाच खरा आधार असतो.’’
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !